ब्रेकिंग : फैजपूर पालिकेतील अनेक धक्कादायक प्रकार उघड होणार? प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! नगरसेविकेचा थेट हल्लाबोल!”
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. नगरपरिषदेत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीतील कामकाजावर आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं ? या प्रशासकीय काळात? किती निधी खर्च झाला? कोणते विकासकामं झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे… त्या कामांचा हिशोब कुठे आहे?” प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका सुमैय्या शेख कुरबान यांनी आज २४/३/२६ जनरल सभेला मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत संपूर्ण कामांचा हिशोब सादर करण्याची जोरदार मागणी केली आहे
“फक्त विकासाच्या घोषणा… की प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच सुरू होतं? निधीचा वापर नेमका कुठे झाला? कंत्राटदारांची निवड कशी झाली? आणि मंजूर कामांची सध्याची स्थिती काय आहे?” या निवेदनात अर्थसंकल्पातील खर्च, महसूल वसुली, कर्ज व्यवहार, तसेच विकास आराखड्यातील बदल याबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे.
“लोकशाहीत नागरिकांना माहिती मिळणं हा त्यांचा हक्क आहे… आणि हाच हक्क मिळवण्यासाठी आता थेट लढा सुरू झालाय!” जर हा हिशोब समोर आला… तर अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“फैजपूरमध्ये प्रशासन पारदर्शक आहे की काहीतरी दडवलं जातंय? या प्रश्नांची उत्तरं मिळणार का… याकडे संपूर्ण फैजपूर शहराचं लक्ष लागलं आहे!”
