भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

‘ऑपरेशन ऑल आऊट’ दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्यासह अटक

स.पो.नी. योगिता नारखेडे यांची धडक कारवाई

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज, डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्यासह अटक केली आहे. चेतन सुधीर पाटील (वय 18, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दि. 23 मार्च 2026 रोजी सायं. 4 ते रात्री 11 वाजेच्या दरम्यान पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट (कॉम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात आले होते. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. 288/2025 (भा.दं.वि. कलम 311, 312 तसेच शस्त्र अधिनियम कलम 3/25) मधील फरार आरोपी चेतन पाटील हा नशिराबाद परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून रात्री सुमारे 8.20 वाजता आरोपीला ताब्यात घेतले.  झडती दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा क्रमांक 93/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत विराणे करीत आहेत.


ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सपोनि योगिता नारखेडे, सपोनि राजेश मेंढे, पोहेकॉ कमलाकर वाघुळ, पोहेकॉ भरत बाविस्कर, पोहेकॉ पंकज सोनवणे, पोहेकॉ भूषण पाटील आणि पोहेकॉ विजय अहिरे यांचा समावेश होता.

याच ऑपरेशन ऑल आऊट (कॉम्बिंग ऑपरेशन)दरम्यान दारूचे अड्डे,जुगार अड्डे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली व एक अवैध वाळूचा डंपर देखील पकडला आहे डंपर पोलिस स्टेशन ला जमा असून त्याची सखोल चौकशी पोलिस प्रशासन व महसूल विभाग करत आहे असे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!