भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

“केवायसी” साठी लाच, १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचाऱ्याला अटक, जळगाव एसीबी ची धडक कारवाई

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे गृहोपयोगी संचवाटप करण्यासाठी ‘केवायसी’ करण्याच्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह अटक केली.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळ तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ येथे शासनाच्या योजनेअतंर्गत गृह उपयोगी संच मिळणेकरीता दि.०९/०४/२०२६ रोजी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार दि.१५/०४/२०२६ रोजी गृह उपयोगी संच ताब्यात घेण्यासाठी चिंचोली ता.जि. जळगव या ठिकाणी हजर राहणेबाबत पत्र प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे तक्रारदार हे गृह उपयोगी संच ताब्यात मिळणेकामी गेले असता त्यांनी सदर संच वाटप केंद्रावरील तब्बसुम शेख यांची भेट घेतली असता, त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना महिला आरोपी आसमा परवीन शेख इरफान (इतर लोकसेवक) यांना भेटण्यास सांगितले. म्हणुन तक्रारदार हे आरोपी महिला आसमा परवीन शेख इरफान यांची भेट घेतली त्यावेळी आसमा शेख यांनी तक्कारदार यांना, गृह उपयोगी संच ताब्यात घेण्यासाठी तुमची केवायसी करावी लागेल व त्यासाठी तुम्हाला १००/- रूपये दयावे लागतील, असे सांगुन त्यांनी तकारदार यांचेकडे १००/- रूपये लाच मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी महिला आरोपी आसमा परवीन शेख इरफान यांचेविरूध्द दि. १५/०४/२०२६ रोजी ला.प्र.वि., जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती.

तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. १५/०४/२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता महिला आरोपी आसमा परवीन शेख इरफान यांनी तक्रारदार यांना गृह उपयोगी संच ताब्यात देण्यासाठी केवायसी करून दिल्याचे मोबदल्यात तकारदार यांचेकडे पंचासमक्ष १००/- रूपये लाच मागणी करून ती स्विकारण्यास संमती दर्शविली होती.

यशस्वी सापळा कारवाई दरम्यान तकारदार चिंचोली येथील गृह उपयोगी संच वाटप होत असलेल्या ठिकाणी गेले असता महिला आरोपी आसमा परवीन शेख इरफान (इतर लोकसेवक) यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम तकारदार यांचेकडुन १००/- रूपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली, म्हणुन यांचेविरूध्द एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे

सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि., जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती रेश्मा चंद्रकांत अवतारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प-ला.प्र.वि. जळगांव, सापळा पथक श्रेयोउपनिरी. सुरेश पाटील, पोहेकॉ/बाळु मराठे, पोकों/राकेश दुसाने, पोकों/प्रदिप पोळ,सर्व नेम.ला.प्र.वि. जळगांव. तपासी अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!