भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

चिनावल मध्ये घरफोडी ; १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले

सावदा, ता.रावेर.मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील चिनावल येथे घर बंद असल्याची संधी साधत घरातून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.

चिनावलचे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे हे त्यांच्या मूळ गावी खडका येथे भावाचा मृत्यू झाल्याने गेले असता यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल १३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.

चिनावल येथील तुकाराम वाडीतील रहिवासी निवृत्त शिक्षक राजेंद्र सरोदे हे त्यांच्या भावाचे निधन झाल्याने मूळ गावी खडका येथे गेले होते. तेथील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर ते १४ रोजी सकाळी ११.३० वाजता चिनावल येथे आले. यावेळी त्यांना घराचा लोखंडी दरवाजा उघडा व मुख्य लाकडी सावदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सन २००९ मध्ये विकत घेतलेला ४९ ग्रॅमचा सोन्याचा राणीहार (७०३९३रुपये), १० ग्रॅमची अंगठी (१७,५६७), ८ ग्रॅमची अंगठी (१४,०१४), २५ ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या (४४४५४), ५ ग्रॅमची अंगठी (८७७५), १३ हजार ६०० रूपयांचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, ४३,४३७ रुपये किमतीचा २८ ग्रॅमचा दुसरा राणीहार असा एकूण २ लाख १२ हजार २६६रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.

चोरट्यांनी तुकाराम वाडीत घरफोडी करताना राजेंद्र सरोदे यांच्या समोरील हेमराज सखाराम सरोदे यांचे बंद घर देखील फोडले. मात्र, सरोदे हे डोंबिवली येथे राहतात. घरात काहीही सामान नव्हते. यामुळे चोरट्यांना तेथून रिकाम्या हाताने परतावे लागले. तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल सानप, हवालदार विनोद तडवी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!