भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडा

तुरीच्या पिकात गांजाची लागवड ; १७५ गांजाची झाडे जप्त

चोपडा.मंडे टु मंडे न्युज | चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकाआड गांजाची अवैध लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतात छापा टाकला. शेताची पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी गांजाची १७५ झाडे जप्त केली. याप्रकरणी देवसिंह बरेला याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

विशेष म्हणजे, गांजाची लागवड करण्यात आलेले हे शेत मध्य प्रदेशाच्या सीमेलगतच्या परिसरात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भागात अमली पदार्थांच्या अवैध लागवडी विरोधात पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.या कारवाईमुळे देवझिरी परिसरात खळबळ उडाली आहे. गांजाच्या अवैध लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाचे इतर काही धागेदोरे आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!