भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

रावेर.मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळता उर्वरित ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावागावातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

आरक्षणामध्ये अनुसूचित जाती (अनु. जाती), अनुसूचित जमाती (अनु. जमाती), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) तसेच सर्वसाधारण प्रवर्गांचा समावेश आहे. यामध्ये महिला आरक्षणाचाही समावेश असून काही पदांचे आरक्षण चिठ्ठीने निश्चित करण्यात आले आहे.

आरक्षणाचा तपशील
अनुसूचित जाती महिला : विवरे खुर्द, कुंभारखेडा, सावखेडा बु., धामोडी, कळमोदा, खानापूर, मस्कावद बु. आदी ग्रामपंचायती.

अनुसूचित जाती : पाडळे खुर्द, खिरोदा प्र. रावेर, गहुखेडा, मुंजलवाडी, वाघोदे खुर्द आदी ग्रामपंचायती.

अनुसूचित जमाती महिला : कोचूर बु., चिनावल, थेरोळे, दोधे, भोर-वाघोड आदी ग्रामपंचायती.

अनुसूचित जमाती : निरुळ, नेहेते, पुनखेडा, मस्कावद सिम, सुदगाव आदी ग्रामपंचायती.

ना.मा.प्र. महिला : सुनोदा, अजंदे, धुरखेडा, वाघाडी, रमजीपूर, विवरे बु., उटखेडा, अहिरवाडी, अजनाड-चोरवड या ग्रामपंचायतींचे सरपंच पद ना.मा.प्र. महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून ही आरक्षणे चिठ्ठीने निश्चित करण्यात आली आहेत.

ना.मा.प्र. : वाघोदा बु., कर्जाद, थोरगव्हाण, सिंगत, खिर्डी बु., दसनुर-सिंगनुर, रणगाव, खिर्डी खुर्द आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिला : उदळी खुर्द, कोचूर खुर्द, मस्कावद खुर्द, आंदलवाडी, सावखेडा खुर्द, पुरी-गोलवाडे, रायपूर, गाते, शिंगाडी, विटवे, भोकरी, मोरगाव बु., निंबोल, मोरगाव खुर्द, वडगाव, बलवाडी, तासखेडा, ऐनपूर, रेंभोटा, निंभोरा बु. आदी ग्रामपंचायतींचे सरपंच पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यातील आरक्षण चिठ्ठीने निश्चित करण्यात आले आहे.

सर्वसाधारण : केहऱ्हाळे खुर्द, भाटखेडा, केहऱ्हाळे बु., खिरोदा प्र. यावल, रसलपूर, उदळी बु.-लुमखेडा ग्रुप, तांदलवाडी, तामसवाडी-बोरखेडा ग्रुप, खिरवड, अटवाडे, पातोंडी-बोहडे ग्रुप, मांगलवाडी, सुलवाडी, निंभोरा सिम, कांडवेल, रोझोदा, कोळोदे, गौरखेडा, नांदुरखेडा आणि शिंदखेडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढण्याची शक्यता असून स्थानिक राजकीय समीकरणांनाही आता नवे वळण मिळणार आहे. कोणत्या प्रवर्गाला सरपंच पदाची संधी मिळणार हे स्पष्ट झाल्याने अनेक गावांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!