तरसोद येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | मौजे तरसोद येथे दिनांक 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय तहसीलदार शीतल राजपूत साहेब, (BDO) साहेबराव पाटील मॅडम तसेच सरपंच संतोष सावकारे उपस्थित होते. याशिवाय गणपती मंदिर अध्यक्ष सुभाष बऱ्हाटे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद इंगळे, अनुकूलन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण दांडगे, संतोष कोळी, ग्रामपंचायत अधिकारी नरेंद्र साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभियानांतर्गत मौजे तरसोद येथे समाधान शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात विविध शासकीय विभागांचे ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, इंडियन पोस्ट, कृषी विभाग, तहसील विभाग, ग्रामपंचायत कार्यालय तसेच शालेय विद्यार्थी व विविध विभागांचे लाभार्थी सहभागी झाले होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले, तर महिला व बालविकास विभागाकडून एकूण 23 लाख रुपयांचे लाभ प्रदान करण्यात आले. तसेच गावातील तरुण मंडळींच्या लोकसहभागातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याच बरोबर वारस नोंद, सातबारा उतारे, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, घरकुल योजना अशा विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभ वितरित करण्यात आले.
