भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

पुणेमहाराष्ट्र

जुन्या मेट्रो कार्ड वरील शिल्लक रक्कम नवीन कार्ड मध्ये वर्ग करण्याची प्रवाशांची मागणी

पुणे.वाघोली. मंडे टु मंडे न्युज. योगेश पाटील || मेट्रोच्या जुन्या कार्डची मुदत संपल्यानंतर त्यावरील शिल्लक रक्कम नवीन कार्डमध्ये वर्ग करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. जुन्या कार्डची मुदत संपून सुमारे तीन वर्षे झालेल्या काही कार्डधारकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.


मुदत संपलेल्या कार्डमध्ये रक्कम शिल्लक असतानाही त्याचा वापर करता येत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच नवीन कार्ड वेळेत उपलब्ध न झाल्याने काही प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. यासंदर्भात प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर मुदत संपलेल्या कार्डवरील रक्कम जमा करून नवीन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


महामेट्रोकडून प्रवाशांसाठी क्यूआर कोडवर आधारित पुणे कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. जुन्या कार्डवरील शिल्लक रक्कम नवीन कार्डमध्ये वर्ग करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


प्रशासनाने जुन्या कार्डवरील संपूर्ण शिल्लक रक्कम नवीन कार्डमध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. संबंधित रक्कम एका खासगी बँकेमार्फत उपलब्ध करून दिली जात असल्याने शिल्लक रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!