भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

दुर्गा उत्सव मिरवणुकीत “गाणे का लावले” यावरून शिवीगाळ करून वाद

निंभोरा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत पार पडत असताना घरकुल परिसरातील दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीतील बँड मध्ये हे गाणे का लावले असे म्हणून काही तरुणांनी वाद व शिवीगाळ केल्याने दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ संतप्त झाले होते परंतु लागलीच निंभोरा पोलीस स्टेशनचे स.पो.नी हरिदास बोचरे फौजदार अभय ढाकणे व निंभोरा पोलीस व होमगार्ड यांनी मिरवणुकीत गोंधळ घालणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले.

याबाबत गोविंदा गणेश जोगी निंभोरा यांनी फिर्याद दिल्याने. तीन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली यात जुबेर आलमगीर खान, अर्शद शेख मुख्तार, फरदीन फिरोज खान. सर्व राहणार निंभोरा बु: (घरकुल परिसर) यांना ताब्यात घेऊन निंभोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात निंभोरा पोलीस अधिक तपास करीत आहे.
हा प्रकार वगळता दुर्गा उत्सव मिरवणुक शांततेत व उत्साहात पडली.


ही घटना समजताच रावेर तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे मंडळ अधिकारी रवी वानखेडे तसेच फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी निंभोरा येथे भेट दिली अशी माहिती निंबोरा पोलिसांनी दिली.


अफवांवर विश्वास ठेवू नये स.पो.नी हरिदास बोचरे:~ निंभोरा व परिसरातील ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट टाकू नये असे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!