ऐनपूर सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात हिंदी भाषा दिन , विविध प्रमाणपत्र वाटप, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सर्वेक्षण,रक्त दान क्लब स्थापन सह कार्यक्रम संपन्न
ऐनपूर, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी |
सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात हिंदी भाषा आणि साहित्य सामान्य ज्ञान प्रतियोगिता संपन्न
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय स्तर हिंदी भाषा एवम साहित्य सामान्य ज्ञान प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रतियोगिता हिंदी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती संपूर्ण भारतीय समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता हिंदी भाषेमध्ये आहे आज जागतिकीकरणाच्या काळात उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी देशभरातील विविध उद्योग समूहांनी जाहिरातीमध्ये हिंदी भाषेच्या वापर मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो अशावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व ओळखले पाहिजे व हिंदी भाषा घराघरात पोहोचवली पाहिजे या उद्देशाने राष्ट्रीय स्तर पर हिंदी भाषा एवम साहित्य सामान्य ज्ञान प्रतियोगिता घेण्यात आली होती.
या प्रतियोगितेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच प्रतियोगितेचे समन्वयक म्हणून प्रा डॉ पी आर गवळी आणि सह समन्वयक म्हणून डॉ.संदीप एस साळुंखे होते प्रतियोगितेच्या यशस्वीतेसाठी मा प्राचार्य. डॉ.जे. बी अंजने यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच डॉ. व्ही एन रामटेके ,प्रा.डॉ.एम .के सोनवणे, प्रा. एस. पी. उमरीवाड ,प्रा अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे यांचे सहकार्य लाभले.
ऐनपुर महाविद्यालयात तहसील कार्यालयामार्फत विविध प्रमाणपत्र वाटप
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात तहसील कार्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनच्या सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध प्रमाणपत्र बाबत शिबिर मा प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी केले. या शिबिरात जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इ बाबत माहिती दिली. या शिबिरासाठी रावेर तहसील कार्यालय चे श्री गणेश बारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रे ची माहिती दिली. व विद्यार्थांना तशी प्रमाणपत्रे तत्काळ उपलब्ध करून दिली. या शिबिरासाठी श्री ऋषिकेश महाजन प्रा मिलिंद भोपे, प्रा कोमल सुतार, प्रा. वैष्णवी डी पाटील, प्रा वैष्णवी पाटील, प्रा हेमंत बाविस्कर, प्रा संदीप साळुंके प्रा व्हि. एच पाटील, डॉ जे पी नेहेते, प्रा एस बी महाजन तसेच हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली व सहकार्य केले
पूरग्रस्त(अतिवृष्टीमुळे बाधित) गावांतील विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसानाचे सर्वेक्षण
ऐनपूर:सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथील राष्ट्रीय सेवा योजना एकका मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड तसेच महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील यांच्या नेतृत्वात आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, रा.से.यो.चे विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जे.पी. नेहेते यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर लगतच्या परिसरातील विटवा, निंबोल, सांगवा, सुलवाडी, कोळदा, ऐनपूर,खिर्डी,निंभोरा,धामोडी, वाघाडी ,पुरी, गोलवाडा,सिंगत कांडवेल , मांगलवाडी, तांदलवाडी व बलवाडी या गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये कोणत्या गावामध्ये पूर गेलेला होता व कोणत्या गावामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे याचे सर्वेक्षण करण्यात आले. आणि सर्व अहवाल प्राचार्यांना सादर करण्यात आला.
ऐनपूर महाविद्यालयात वाढदिवस रक्त दान क्लब स्थापन
सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत वाढदिवस रक्तदान क्लब स्थापन करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते हे उपस्थित होते. त्यांनी वाढदिवस रक्तदान क्लब या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या वाढदिवसाला जवळच्या रक्तपेढीवर जाऊन रक्तदान केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले पाहिजे असे अध्यक्षीय समारोपात डॉ. वैष्णव यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी तर आभार सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी एस. पी. उमरीवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन वैष्णव, डॉ. जे. पी. नेहेते, डॉ एस. ए. पाटील, डॉ. एम. के. सोनवणे, डॉ. व्ही. एन. रामटेके, एस. पी. उमरीवाड डॉ. पी. आर. गवळी, प्रा. अक्षय महाजन, प्रा. प्रदीप तायडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा