हद्दपारीचा आदेश संभाजीनगर खंडपीठाकडून रद्द
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भुसावळ येथील खाजगी कोचिन क्लासेसचे गणेश मारोती बोरे यांचा हद्दपारिचा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे. येथील पोलिसांच्या अहवाला नंतर दंडाधिकारी यांनी बोरे यांचा हद्दपारिचा आदेश दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी काढला होता.प्रस्तुत व्यक्ती यांनी संभाजनगर खंडपीठात ( हायकोर्टात) दाद मागितली होती न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व हितेन वेणू गावकर यांच्या खंडपीठाने हा हद्दपारीचा आदेश रद्द ठरविला आहे.
आदेशात 15 जुलै 2024 रोजीची वादग्रस्त कारणे दाखवा नोटीस आणि 5 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेला परिणामी अंतिम हद्दपारचा आदेश कायद्याने टिकाऊ नाही आणि म्हणूनच तो रद्द करण्यास पात्र आहे असेही म्हटले आहे.

