भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

गुटख्याच्या भ्रामक जाहिराती वरून बॉलिवूड सेलिब्रेटींना कोर्टाची नोटीस

मुंबई, मंडे टु मंडे न्युज |गुटख्याची भ्रामक जाहिरात केल्याप्रकरणी शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफ, अग्रवाल ला कोर्टाची नोटीस पाठविण्यात आली आहे.

५ रुपयांच्या गुटख्यामध्ये ५ लाख रुपयांचे केशर!  अशा प्रकारे केसर च्या नावाखाली विमल पान मसाल्याच्या भ्रामक जाहिरातीतून ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ आणि कंपनीचे मालक विमल अग्रवाल यांना राजस्थानच्या बारां जिल्हा ग्राहक न्यायालयाने नोटीस बजावली असून ९ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पैसे मिळवण्यासाठी सेलिब्रिटी काहीही करतात
५ रुपयांच्या गुटखा पाकिटात ५ लाख रुपये किलोचे महागडे केशर असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आणि आरोग्यासाठी घातक असल्याचा आरोप करत एका नागरी हक्क संस्थेने ही तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने सर्व आरोपींना ३० दिवसांच्या आत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले असून, तसे न केल्यास एकतर्फी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालण्यासंदर्भात पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!