भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर व चौफुलीवर हायमास्ट दिव्यांची मागणी

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज, डॉ . दीपक लोखंडे | येथील महालक्ष्मी मंदिराकडून पशुखाद्य कंपनीकडे जाणारा मार्ग हा मुख्य महामार्गाला छेद देणारा महत्त्वाचा चौफुली रस्ता असून, या ठिकाणी वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

या मार्गावर जळगाव व भुसावळकडे जाणारे दोन्ही सर्विस रोड असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या बैलगाड्या, कामगार तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरातून भुसावळकडे जाणारी रहदारी या मार्गावरून सतत सुरू असते. विशेषतः सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात. वेगाने धावणारी वाहने आणि वाढती वर्दळ यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, दोन्ही सर्विस रोडवर तातडीने स्पीड ब्रेकर बसविणे आवश्यक आहे. तसेच चौफुलीवर पुरेशा प्रकाशव्यवस्थेअभावी रात्रीच्या वेळी अंधार पसरत असल्याने येथे हायमास्ट दिवा उभारणे अत्यावश्यक ठरत आहे.

आज नुकताच त्या जागेवर मोटरसायकलचा एक्सीडेंट झालेला आहे त्यामध्ये महिलेला किरकोळ दुखापत झालेली आहे. यामुळे असाच मोठा अपघात घडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे.bराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी सदर समस्येकडे लवकरात लवकर लक्ष द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!