भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

पाल परिसरातुन महसूल अधिकार्‍याच्या नाकावर टिच्चून वाळू तस्करी जोमात ; भरारी पथक कोमात..

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पाल परिसरातुन येथील महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नाकावर टिच्चून रेती तस्करी बिनबोभाट सुरु असुन तालुक्यात महसुल विभागाच्या नाकावर टिचून रेतीची चोरी बिनबोभाट पणे सुरु आहे. पाल, कुसुंबा, चिनावल , खिरोदा फैजपूर, महसूल व पोलिस विभागाच्या आशीर्वादाने दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची अवैध तस्करी सुरू आहे. वाळू तस्करीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू आहे. गावामध्ये दलालामार्फत अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करुन रेती माफीया गब्बर झाले आहेत. येथील महसुल विभाग मुग गिळुन चुपचाप आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परिसरात वाळू तस्करीला चांगलेच उधाण आले आहे. कोणालाही न जुमानता ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू माफियांकडून दिवसाकाठी शेकडो ब्रास वाळूची तस्करी करण्यात येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग व पोलिस यंत्रणा मात्र गप्प आहेत. त्यामुळे पाल, खिरोदा, रावेर, कुसुंबा, चिनावल, फैजपूर या हद्दीतून या मार्गे पुढ़े शेकडो ब्रास वाळूची अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे नंबर प्लेट काढून टाकण्यात आलेले आहेत. अवैध वाळू तस्करांना कोणाचीच भीती राहिलेली नाही.

वन्यजीव अधिकारी रेती तस्करांवर कारवाई करतात मात्र संबंधित महसूल अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. पाल परिसरातून सुमारे ४० ते ५० तस्कर वाळूची तस्करी करीत असताना महसूल विभाग झोपेत आहे की झोपेचे सोंग घेतले आहे चिरीमिरीच्या ओझ्याखाली…. प्रत्येक वळू तस्कराकडे दोन दोन तीन तीन गाड्या असून ही तस्करी रात्रीच्या वेळेत सर्रास सुरू असते. लागे बांधे असल्याने महसूल अधिकारी ओरड झालेल्या एखादी थातुर मातुर कारवाई करतात.

गाव – खेड्यांमधून भरधाव धावणाऱ्या ट्रॅक्टरांना कोणी हटकल्यास मुजोरीची भाषा वापरतात. वाळू माफियाना कोणी अडवले तर आम्ही हप्ते देतो. त्यामुळे आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही, अशी मुजोरीची भाषा वापरतात असे नागरिकांची ओरड आहे. सुरू असलेल्या या वाळू तस्करी व ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील चांगल्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

वाळू तस्करी जोमात असताना पाल परिक्षेत्रातील महसूल विभाग आणि पोलिस यंत्रणा कोमात गेल्याचे तस्करांना आळा घालणारा तरी कोण? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. पर्यावरणाचे नुकसान करण्यासह शासनाच्या महसुलावर दरोडा टाकणाऱ्या तस्करांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आवर घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!