भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यातील भाविक महिलेचा पंढरपुरात अपघाती मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज |यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातील महिलेचा पंढरपूर वारीदरम्यान अपघाताने मृत्यू झाला अंजनाबाई रामलाल पाटील वय ६५ वर्ष. असे मृत महिलेचे नाव आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील अंजनाबाई पाटील या पंढरपूर वारीसाठी बसने गेल्या होत्या. २३ जुलै गुरुवार रोजी त्या गणगापूर-तुळजापूर करून पंढरपूरच्या मार्गे मोहोळ येथे रात्री नऊ वाजता शौचाला जात असताना महामंडळाच्या बस (क्रमांक एम.एच.१४ एन.ई. ७१६०) ने जोरदार धडक दिली. त्यांना लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत माहोळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत महिलेवर शुक्रवार, २४ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत महिला या
रामलाल नागो पाटील यांच्या पत्नी असून त्यांच्या
पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे व मुली असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!