भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात डिझेल चोरीचा पर्दाफाश ; भिवंडीतील दोघे जेरबंद, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके |मुक्ताईनगर पोलिसांनी डिझेल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत भिवंडी येथील दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख २० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


३० जुलै २०२६ रोजी सरस्वती नगर, मुक्ताईनगर येथील दिनेश भास्कर बाविस्कर (व्यवसाय – एकवीरा ट्रॅव्हल्स) यांनी त्यांच्या मालकीच्या टाटा LPO-1618 (क्रमांक MH-19/CY-2277) या ट्रॅव्हल्सच्या इंधन टाकीचे झाकण उघडून अज्ञात चोरट्यांनी ३४० लिटर डिझेल चोरी केल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३०४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.


गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी वरणगाव पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील संशयितांची माहिती व तांत्रिक पुरावे संकलित केले. त्यानुसार वरणगाव येथील एका गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या आयशर वाहन क्रमांक MH-04/DK-7170 वर पाळत ठेवण्यात आली. घोडसगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून हे वाहन ताब्यात घेण्यात आले.
वाहनातील रईस हासीम शेख (वय ४२) व मुकेश सुकलाल पवार (वय ४०), दोघेही रा. भिवंडी, जि. ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता मूळ इंधन टाकीव्यतिरिक्त वाहनाच्या बॉडीमध्ये बेकायदेशीररीत्या लोखंडी टाकी बसविल्याचे आढळले. ही टाकी चोरी केलेले डिझेल साठविण्यासाठी तयार करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी नोंदविला. त्यामध्ये सुमारे २१० लिटर डिझेल, तसेच डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणारी मोटार व प्लास्टिकची नळी आढळून आली.


चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांनी डिझेल चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून १९,७४० रुपयांचे २१० लिटर डिझेल, ५ लाख रुपयांचे आयशर वाहन आणि ५ हजार रुपयांची मोटार व नळी, असा एकूण ५,२०,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. महेंद्र सुरवाडे, पोना. सुरेश मेढे, पोना. संदीप वानखेडे, पो.अं. चेतन महाजन, पो.अं. दीपक ढाकरे, पो.अं. तुषार महाजन व पो.अ. अक्षय वाढे यांनी पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अटकेत असलेल्या आरोपींकडून अशाच प्रकारच्या इतर डिझेल चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!