भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सातपुडा पायथ्याशी रात्रीपासून जोरदार पाऊस, सुकी नदीला महापूर…

कुंभारखेडा. ता. रावेर (प्रा योगेश कोष्टी) मंडे टू मंडे न्यूज | सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी पालसह परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाच्या आगमनामुळे सुकी नदिला महापुर आला असून परिसरातील गावांचा तालुक्यातील संपर्क तुटला आहे.


गेल्या २० दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्रीपासून परिसरात जोड पकडला असून कुंभारखेडा सह चिनावल, लोहारा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. परिसरातील जीवनदायी ठरलेले सुकी नदीवरील पाल जवळील गारबर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्याचबरोबर लोहारा येथील बंधारा ओसंडून वाहत असून त्यामुळे सुकी नदीला महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील लोहारा आणि कुंभारखेडा येथील सुकी नदीवरील पूल पाण्याखाली गेले असून यामुळे या गावांचा तालुक्याची संपर्क तुटलेला आहे.


प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
रात्रीपासून चालू असलेल्या पावसाने परिसरात काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, त्याचबरोबर नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!