१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणातील फरक माहिती आहे का?
🇮🇳 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या ध्वजारोहणातील फरक माहित आहे का?
🇮🇳 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये ध्वजारोहणाच्या पद्धतीत नेमका काय फरक आहे?
ही महत्त्वाची माहिती प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याला माहित असायलाच हवी! 📚
🇮🇳 जय हिंद! जय भारत!
ही पोस्ट सामान्य ज्ञान व शैक्षणिक माहितीसाठी तयार करण्यात आली आहे. माहिती उपलब्ध सार्वजनिक स्रोतांच्या आधारे सादर केली आहे. अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी स्रोत तपासा.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या ध्वजारोहणातील फरक माहिती आहे का?
मंडे टु मंडे न्युज | १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे, ज्या दिवशी भारत ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, ज्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. १५ ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती कर्तव्य पथावर झेंडावंदन करतात
ऐतिहासिक महत्त्व
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन):
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटीश सत्तेकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले.
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन):
२६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अमलात आले. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
ध्वजारोहण आणि झेंडावंदन मधील फरक
१५ ऑगस्ट: राष्ट्रध्वज खाली बांधलेला असतो. तो दोरीने खालून वर नेऊन उंचावर फडकवला जातो. याला ध्वजारोहण (Flag Hoisting) म्हणतात
२६ जानेवारी:
राष्ट्रध्वज आधीच खांबाच्या वरच्या बाजूला बांधलेला असतो. तो दोरी ओढून फक्त उघडला व फडकवला जातो. याला झेंडावंदन (Flag Unfurling) म्हणतात.
प्रमुख व्यक्ती आणि ठिकाण
१५ ऑगस्ट: भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि राष्ट्राला संबोधित करतात.
२६ जानेवारी: भारताचे राष्ट्रपती नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर (राजपथ) झेंडावंदन करतात. या दिवशी भव्य परेडचे आयोजन होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

