भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ : जुन्या वादातून १९ वर्षीय युवकाची चाकूने हत्या

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके |
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या वादातून १९ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१४ ऑगस्ट) रात्री घडली. अबुजर रफीक शेख (१९, रा. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ८.४५ वाजता बेलसवाडी येथील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर ही घटना घडली. मागील भांडणाचा राग तसेच सतत छेड काढत असल्याच्या कारणावरून अल्पवयीन आरोपीने अबुजरच्या छातीवर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चाकूच्या हल्ल्यात अबुजर गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा
या घटनेनंतर मृताचे वडील रफीक शेख नुरा (४०) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलिसांकडून तपास सुरू
पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश गोसावी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जुन्या वादाची नेमकी पार्श्वभूमी, हल्ल्याचे कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!