भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

धार्मिकभुसावळ

श्री क्षेत्र चौरंगीनाथ महाराज मंदिरात ११ सप्टेंबरला यात्रोत्सव,१० सप्टेंबरला पालखी, भाविकांसह निसर्ग प्रेमींना उपस्थितीचे आवाहन

भुसावळ.मंडे टु मंडे न्युज |  कुर्‍हे पानाचे गावापासून काही अंतरावर निसर्गरम्य परिसरात वसलेले श्री क्षेत्र चौरंगीनाथ बाबा समाधी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सणाच्या पाडव्याच्या निमित्ताने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा, तर ११ सप्टेंबर रोजी यात्रोत्सव होणार आहे.

सवंत ११११ मधील हेमाडपंथी स्थापत्य पद्धतीने बांधलेले हे मंदिर नाथसंप्रदायातील चौरंगीनाथ महाराजांचे प्राचीन समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळात १२ जून १८६३ रोजी घोषित झालेले हे नाथपंथीय तीर्थक्षेत्र धार्मिक महत्त्वासोबतच निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते.
पोळा सणाच्या पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते.

जिल्ह्यासह विविध भागांतील भाविक नवसपूर्तीसाठी मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. भाविकांच्या श्रद्धेने या स्थळाची पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आजही जपली जात आहे. मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणामुळे निसर्गप्रेमींसाठीही हे आकर्षणाचे केंद्र ठरते.


यंदाच्या यात्रोत्सवानिमित्त पालखी सोहळा व यात्रेत जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच या ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळाला भेट देण्यासाठी निसर्गप्रेमींनीही उपस्थित राहावे, असे निमंत्रकांनी सांगितले आहे.
निमंत्रक : श्री चौरंगीनाथ महाराज मंदिराचे पुजारी हर्षल नाथ महाराज व लखन नाथ सजोले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!