भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

अखेर नशिराबाद नगरपरिषदेकडून वाकी नदी स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | वाकी नदीच्या साफसफाईबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर नशिराबाद नगरपरिषदेने तत्काळ दखल घेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाकी नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून नदी परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील वाकी नदीपात्रालगतच्या मन्यार मशीद परिसर, खिडकी वाडा परिसर आणि निमजाय माता मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नदीपात्रातील वाढलेली झाडे-झुडपे, गवत तसेच साचलेला कचरा हटवून नदी स्वच्छ करण्यात आली.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, नदीपात्र स्वच्छ व मोकळे राहावे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले. आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक काम करून नदीतील अडथळे दूर करत परिसर स्वच्छ केला.

यावेळी नागरिकांना नदीमध्ये प्लास्टिक, कचरा किंवा इतर घाण टाकू नये, असे आवाहन करण्यात आले. स्वच्छ व निरोगी शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.

नगरपरिषदेच्या वतीने भविष्यातही अशा स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी हाती घेतलेल्या वाकी नदी स्वच्छता उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. भविष्यातही ते गावाच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!