भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुका हादरला ! ४७ वर्षीय सख्ख्या मावस काकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक धक्कादायक संतापजनक घटना रावेर तालुक्यातून समोर आली. ४७ वर्षीय सख्ख्या मावस काका ने सख्ख्या साडूच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार रावेर तालुक्यातून समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हा पीडित मुलीचा नात्याने मावस काका असून या ४७ वर्षीय मावस काकाने गेल्या काही महिन्यांपासून पीडितेवर दबाव टाकून वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार १२ नोव्हेंबर २०२५ ते २९ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सदर पीडित तरुणी अल्पवयीन असून दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस दाखवत सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर सावदा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी नराधम मावसकाका विरुद्ध न्याय संहिता कलम ६४ (२) (एफ), ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ६ आणि ५ (एन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली उडाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!