खान्देश सुपुत्र डाॅ.पृथ्वीराज सैंदाणे याना मराठवाड्यात ( संभाजी नगर)येथे “महा अँक्युपक्चर रत्न पुरस्कार
संभाजीनगर,मंडे टु मंडे न्युज | दिनांक 19 जुलै 2026 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)येथे भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते “महाअँक्युपक्चर रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
( *आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन ही आयुर्वेद, योग,सिध्दा,होमिओपॅथी, अॅक्युपंक्चर, आणि निसर्गोपचार अश्या सात चिकित्सा पद्धतींना एकत्रीत घेऊन कार्य करणारी भारतातील एक अग्रगंन्य रजिष्ठार संस्था आहे. )(आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएशन आणि (AGMA) यांचा वतीने) अॅक्युपंक्चर अॅड नॅचरोपॅथी चा प्रचार प्रसार करणारे उपचारकांची दखल घेत जळगांव जिल्यातील चोपडा तालुक्यातील “वामन अॅक्युपंक्चर अँड नॅचरोपॅथी केंद्र” ,चालवणारे डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे. यांना त्यांच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेत त्यांनी हजारो रूग्णांची जळगांव जिल्ह्यात सेवा केली आहे.
आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोशिएयन आणि (AGMA)यांचा वतीने “महा अँक्युपक्चर रत्न पुरस्कार 2026” चा प्रतिष्ठेच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे मराठी सिनेकलावंत डाॅ. सुयोग गोरेंद्र, ॲड. नाझिर काझी (प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ॲड. दत्ता त्रय जाधवर, ॲड. नागेश सोनुने. आदी उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती:- चेअरमन डाॅ. सतिष कराळे, व्हाईस चेअरमन डाॅ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. बाबुराव कानडे, डाॅ. अभिजीत कवठकर, डाॅ. प्रशांत सावंत, डाॅ. दिशा चव्हाण, डाॅ. स्मिता खारकर, डाॅ. विनोद ढोबळे, डाॅ. सारंग फुके, डाॅ. श्रीधर मेश्राम, डाॅ.राजेंद्र गोरे, डाॅ. तुषार वाघुळदे, डाॅ. विजय पाटील. यांच्या सह AIMA / AGMA चे पदाधिकारी आणि अनेक वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.


