धक्कादायक : यावल तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी एकटी असल्याचे पाहून अल्पवयीन मुलीस सोमवारी रात्री घरा शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने तिच्या घरातून बाहेर बोलावून नेले आणि गावातील स्मशानभूमीच्या परिसरात नेऊन तिच्यावर लैगीक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सदर प्रकार पीडित मुलीच्या काकाच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणीपिडीत मुलीच्या काकांनी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरूध्द फिर्याद दिल्याने बालकांचे संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयीतास पोलीसांनी अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती अनुसार दहिगाव तालुका यावल या गावात एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी होती. दरम्यान सदर मुलीचे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांकडे जळगाव येथे गावी गेले असल्याने व मुलगी एकटी घरी होती दरम्यान या मुलीला साबीर उर्फ आसिफ पिंजारी वय २२ वर्ष या तरुणाने सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कसले तरी आमिष दाखवुन घराच्या बाहेर बोलवले आणि रात्री १० वाजता पिडीत मुलीला सोबत गावातील स्मशानभूमीच्या परिसरात घेवुन गेला व त्या ठीकाणी तिच्या वर लैंगिक अत्याचार केला व नंतर तिला तिच्या घराजवळ सोडून तो निघून गेला.
सदरचा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीच्या काकाच्या निदर्शनास आला. पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार काकाला सांगितला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पिडीत अल्पवयीन मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून भा. न्या . सं .१३७ कलम (२ ) ६४ (२),बालकांचे लैंगिक अत्याचार पासुन संरक्षण कायदा पोक्सो कलम ४ ,५ ( एल )६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.


