संतापजनक : चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल
नशिराबाद.मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे |१३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून पीडितेला चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक तेव्हढीच संतापजनक घटना नशिराबाद पोलिस स्टेशनच्या हद्दीतून उघडकीस आली.
याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील सावके (सुपरवायझर, गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस) याच्याविरुद्ध कलम 64, 65 पोस्को अधिनियम कलम 4, 6, 8, 12 प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांच्याकडे संबंधित गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला असून कर्मचारी गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर भिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार आणि भूषण पाटील हे तपास कामी मदत करीत असून पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


