भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

२३ गुन्ह्यांमध्ये जप्त पावणेतीन कोटी रुपयांचा गांजा पोलिसांकडून नष्ट

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थ कायद्यान्वये दाखल विविध गुन्ह्यांपैकी २३ गुन्ह्यांमधील २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये किमतीचा एकूण १३६२ किलो गांजा अंमली पदार्थ नाश समिती समोर पोलिसांनी मोठा खड्डा खोदून ११ मे रोजी नष्ट केला.

सदरची कार्यवाही सकाळ व दुपार अशा दोन सत्रात शहरातील जिल्हापेठ पोलिस स्टेशन इमारत मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती समोर करण्यात आली. मोठा खड्डा खोदून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल ही काळजी घेत हा सर्व गांजा नष्ट करण्यात आला.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीमधील सदस्य अपर पोलिस अधीक्षक, संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर तसेच अधीक्षक, कृषी विभाग, जळगाव यांचे प्रतिनिधी विकास बोरसे, वजनमापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांच्या उपस्थितीत केली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली सहायक फौजदार संजय दोरकर, पो.कॉ. संदीप पाटील, पो.कॉ. जयंत चौधरी, पो.कॉ. अजय धर्वक यांनी हा गांजा साठा नष्ट केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!