Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी बु. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; सर्वपक्षीय नेते व सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा

रावेर, मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील बसस्टॉप ते जिल्हा परिषद मराठी शाळे दरम्यानचा रस्ता अत्यंत जीर्ण व धोकादायक बनल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश मनोहर देवगिरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी २६ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी २४ जून २०२५ आणि २ जुलै २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या मुरूम व खडीने भराव्यात, खोल भागात डांबरी अथवा सिमेंट काँक्रीटचा रस्ता करावा तसेच बसस्टॉप ते टनकाटा दरम्यानचा संपूर्ण रस्ता तातडीने दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करावा, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ऐनपूर रोडवरील खिर्डी बुद्रुक येथील जेडीसीसी बँकेसमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), तहसीलदार, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच ग्रामसेवक यांना पाठविण्यात आली आहे.

उपोषणस्थळी प्रभारी सरपंच अतुल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील व घनश्याम पाटील, योगेश जाधव, अॅड. चंद्रजीत पाटील, कांतिलाल गाढे, प्रदीप महाराज, शेख इद्रीस, डॉ. सुनील कोल्हे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कोचुरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मोठ्या संख्येने ग्रामस्थही उपोषणस्थळी उपस्थित आहेत.

कायदोव्यवस्थेच्या दृष्टीने तलाठी हर्षल पाटील, पोलीस पाटील रितेश चौधरी, निंभोरा पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक ममता तडवी व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. येवले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. मात्र, “तात्पुरती नव्हे तर संपूर्ण दर्जेदार रस्ता तयार होईपर्यंत उपोषण सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते गणेश देवगिरकर यांनी मांडली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!