भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

ऐनपूर येथे २२ जुलै रोजी विधी विषयक शिबिर

ऐनपुर, ता. रावेर. विजय के अवसरमल | सचिव, जिल्हा विधी सेवा समिती, जळगांव यांचे आदेशान्वये दि. २२/०७/२०२५ मंगळवार रोजी सकाळी ९:३० वा. रावेर तालुक्यातील ‘सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय’ ऐनपूर, या ठिकाणी जिल्हा विधी सेवा समिती जळगांव व तालुका विधी सेवा समिती, रावेर यांचे संयुक्त माध्यमातुन शिबीराचे आयोजन करण्यांत आलेले आहे.


शिबीराचे अध्यक्ष पी. एच. बनसोड, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव, तर प्रमुख पाहूणे म्हणून . व्ही. व्ही. जटाळ, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, रावेर तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, रावेर तसेच वकील संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, गट विकास अधिकारी, रावेर, तहलिदार, रावेर, कृषी अधिकारी, रावेर, तसेच निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ऐनपुर, इ. अधिकारी हजर राहून विद्यार्थी, ग्रामस्त यांना मार्गदर्शन करणार आहेत.


शिबीराचे महत्वाचे मुद्दे- शासकीय योजनांची माहिती, आधारकार्ड कॅम्प, मुलांचे लैंगिक शोषणाबाबतची माहिती, रक्तदान शिबीर, (५) रोप वाटप इ. या विषयांचा समावेश शिबीरात असणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन बी. डी. बारी, वरिष्ठ सहाय्यक तालुका विधी सेवा समिती, तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय, रावेर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!