रेल्वे प्रशासनाचा निर्णय ; भुसावळहून धावणाऱ्या “या” रेल्वे गाड्या तीन दिवस रद्द
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ऐन दिवाळी सारखे सणासुदीचे दिवस असताना भुसावळहुन धावणाऱ्या एक्स्प्रेससह मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागातील जळगाव मनमाड दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाइन, लाँग हॉल लूप लाइनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ७ ते ९ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक दरम्यान नांदगाव स्थानक व यार्डात यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे सलग तीन दिवस देवळाली एक्स्प्रेस, इगतपुरी मेमू या गाड्या रद्द असतील. तर लांब पल्ल्याच्या तीन गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.या मुळे रेल्वे प्रवाशांना गैरसोयी मुळे मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

तीन दिवस रद्द केलेल्या रेल्वे गाड्या
७ व ८ ऑक्टोबर : ११११३ देवळाली -भुसावळ एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, ११११९ इगतपुरी – भुसावळ मेमू, १११२० भुसावळ – इगतपुरी मेमू. ऑक्टोबरला रद्द गाड्या : ११११३ ९ देवळाली – भुसावळ एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, ११११९ इगतपुरी – भुसावळ, १११२० भुसावळ – इगतपुरी मेमू.
दिनाक ९ रोजी विलंबाने धावणाऱ्या गाड्या
१२१७१ एलटीटी- हरिद्वार एक्स्प्रेस सकाळी ७.५५ ऐवजी १०.२५ वाजता सुटेल. २२३१२ एलटीटी – गोड्डा एक्स्प्रेस सकाळी ८.०५ ऐवजी १०.०५ वाजता सुटेल. १२५३४ मुंबई लखनऊ एक्सप्रेस सकाळी ८.२५ ऐवजी १०.२५ वाजता सुटेल (२ तास उशिरा) धावेल. या गाड्या मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनच विलंबाने सुटतील.

