भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

“ही” चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही… पोस्ट व्हायरल…  सरकारनं केलं स्पष्ट …

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. १९९० आधी जन्मलेले हे ४ कागदपत्रे नसेल, तर महाराष्ट्रात राहता येणार नाही’, अशा स्वरूपाची एक पोस्ट व्हायरल झाली. एका युट्यूब चॅनलवर यासंदर्भातील व्हिडीओ केल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्ट मुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करणाऱ्या या पोस्टबद्दल राज्य सरकारकडून भूमिका मांडण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड ही कागदपत्रे नसतील, तर महाराष्ट्रात राहता येणार नाही, असे म्हटले गेले. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालय विभागाकडून व्हायरल होत असलेली ही पोस्ट करुन, ती
खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही दिशाभूल करणारी पोस्ट आहे. राज्य सरकारकडून बनावट कागदपत्रे असलेल्या विरोधात कारवाई केली जात आहे. त्या कारवाईचा चुकीचा अर्थ लावत दिशाभूल करणारी पोस्ट केली गेली आहे.

लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, ही दिशाभूल करणारी पोस्ट
डीजीआयपीआरने म्हटले आहे की, ‘शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र,रेशन कार्ड ही कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा दिशाभूल करणारा आहे. बनावट कागदपत्रांसंदर्भातील कारवाईला चुकीच्या पद्धतीने ‘राहण्यावर बंदी’ म्हणून दाखवून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अपूर्ण व अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये असे राज्य सरकारने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!