भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पुन्हा जिल्हा हादरला …! २६ वर्षीय तरुणाचा निर्घुण खून…

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |  सोमवार रोजी सहा ते सात जणांनी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मधील २६ वर्षीय तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १८ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी तील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ अज्ञात ६ ते ७ जणांनी तीक्ष्ण धारदार हत्याराने वार करून निघृण हत्या करण्यात आली. विशालचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हत्येचे कारण अद्याप  अस्पष्ट..
अज्ञात मारेकऱ्यांनी विशालचा खून का केला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
विशाल रमेश मोची हा जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी मध्ये राहत होता. त्याच्या पश्चात आई-वडिलांसह, लहान भाऊ उदय आणि एक विवाहित बहीण असा परिवार असून विशाल हा सोलर पॅनेलच्या बेस बसविण्याचे काम करत होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!