मुलीच्या साखरपुड्या आधीच आई फरार, प्रियकरा सोबत केलं लग्न, स्टेटस ठेवलं आणि बिंग फुटलं…जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर असताना मुलीच्या आईने पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केल्याची घटना समोर आली. मुलीच्या आईच्या प्रियकराने लग्नाचे फोटो स्टेटस वर ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला. अखेर हतबल झालेल्या महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर मध्ये घडली.
म्हणतात प्रेम हे आंधळ असतं, मात्र त्यालाही काही मर्यादा असतात. समाजाचं, वयाचं… आजकाल कुठे काय घडेल याचा काही नेमच नाही. आजकाल प्रामविरांच्या अशा अनेक घटना घडत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचा साखरपुडा म्हणजे एका आईच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण असतो आणि याच वेळी मात्र एका आईने पळून जाऊन प्रियकरासोबत मुलीच्या साखरपुड्या आधीच लग्न लावले. या घटनेने मोठी खळबळ उडाली.
मुलीचा साखरपुडा अवघ्या ५ दिवसांवर असताना तिच्या आईनेच प्रियकरासोबत पलायन करून लग्न उरकल्याची ही धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबावर सामाजिक नाचक्कीची वेळ आली आहे.
साखरपुडा मुलीचा आणि आई प्रियकरासोबत फरार..की.थेट लग्न….. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका कुटुंबात मुलीचा साखरपुडा ठरला होता. त्यांच्या घरात लग्नाची आणि साखरपुड्याची तयारी उत्साहात सुरू होती. मात्र साखरपुड्याला अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच मुलीच्या आईने अचानक घरातून पळ काढला. यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत थेट लग्न केले. हा सर्व प्रकार गुप्त होता. मात्र मुलीच्या आईच्या प्रियकराने त्यांच्या विवाहाचे फोटो आपल्या मोबाईलच्या व्हॉटसअप स्टेटसवर ठेवला.
स्टेटस ठेवले ..आणि बिंग फुटलं…
प्रियकर पतीने लग्नाचे फोटो स्टेटस वर ठेवताच संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी ते फोटो पाहिले. आणि हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने मुलीच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, तिथे अचानक शांतता पसरली. आपल्या पत्नीने असे पाऊल उचलल्याने आणि प्रियकराने ते फोटो सोशल मीडियावर जाहीर केल्याने समाजात कुटुंबाची मोठी नाचक्की सुरू झाली. या परिस्थितीने हतबल झालेला महिलेचा पती थेट जामनेर पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे, समाजात आमची मोठी नाचक्की होत आहे. कृपया त्यांना ते मोबाईलवरील स्टेटस तातडीने काढायला सांगा, अशी केविलवाणी आणि आर्त विनंती पतीने पोलिसांकडे केली.
पतीची ही हृदयद्रावक व्यथा ऐकल्यानंतर जामनेर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलत
तात्काळ त्या प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून कायदा आणि सामाजिक परिस्थितीचा पोलिसी भाषेत जाणीव करून देत समज दिल्याने अखेर प्रियकराने आपल्या मोबाईलवरील ते स्टेटस हटविले. मात्र ते स्टेटस हटविल्याने या संपूर्ण प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला असला तरी मुलीच्या कुटुंबावर या धक्कादायक घटनेने पडलेला मानसिक व समाज्यात बदनामीचा त्रास मात्र सोसावा लागत आहे . मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या अजब लग्नाची चर्चा आता रंगत आहे.


