भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

एसटी बस स्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतुकीवर बंदी च्या परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ! आदेश फक्त कागदोपत्रीच

मुंबई | मंडे टू मंडे न्यूज | राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे किंवा उतरविणे यावर बंदी असताना या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


एसटी महामंडळ ही राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून, तिच्या उत्पन्नावर परिणाम करणारी तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे खासगी वाहने उभी करून प्रवासी वाहतूक केल्यामुळे एसटीच्या महसुलात घट होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
यामुळे राज्यातील सर्व संबंधित प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि परिवहन विभागाने समन्वय साधून बसस्थानक परिसरात कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.


दरम्यान, एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवासी घेणे अथवा उतरविण्यास बंदी घालणारा आदेश यापूर्वीही अस्तित्वात असतानाही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे चित्र आहे. संबंधित आदेशाकडे दुर्लक्ष होत असून तो प्रत्यक्षात ‘कागदोपत्री’च राहिल्याची टीका होत आहे. त्यामुळे यावेळी प्रशासन खरोखरच कठोर कारवाई करून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!