वासरावर बिबट्याचा हल्ला! वासराचा मृत्यू ,शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंता
चोपडा.मंडे टु मंडे न्युज. सचिन पाटील || चोपडा तालुक्यातील बुधगाव परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी विनोद दादा वाघ यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यात वासराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंता वाढली असून, वनविभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


