भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये एसीबीची मोठी कारवाई, उपनिबंधक बारी याच्या लॉकर मधून १ कोटी ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिड लाखांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जळगाव एसीबीने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी जळगाव एसीबीच्या पथकाने भुसावळात येवून आरोपीच्या घराची झडती घेतली होती.

जगदीश बाबुराव बारी, उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका जळगाव रा.शांती नगर, यावल रोड भुसावळ यांच्यावर दिनांक २०/०५/२०२६ रोजी यशस्वी सापळा कारवाई झाल्याने त्यांचेवर जिल्हापेठ पो.स्टे. गु. र.नं. १७०/२०२६, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने दिनांक २३/०५/२०२६ रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील आरोपी जगदीश बाबुराव बारी, उपनिबंधक यांच्या घरझडती दरम्यान त्यांचे कॉसमॉस बँक, भुसावळ येथे लॉकर असल्याची माहीती मिळाली होती. सदर लॉकरची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यामध्ये १) ९९,०४,९६०/- रू.कि. ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगडया व सोन्याचे बिस्किट, २) ८,३६,५००/- रोख रक्कम त्यात सर्व ५००/- रू दराच्या नोटा, ३) २६२५/- रू.किं. चे १०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकुण ०१,०७,४४,०७५/- रू. किंमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम मिळुन आला असुन सदरचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम जमा करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
एसीबीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी संदर्भात कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव कार्यालयात सुरू होती. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच अवैध सावकारी चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी जळगाव उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. नंतर ही रक्कम तीन लाख रुपये ठरली व पहिला हप्ता म्हणून दिड लाख स्वीकारण्याचे मान्य होताच एसीबीला तक्रार देवून सापळा रचण्यात आला. बुधवार, २० मे रोजी सापळा रचला. आरोपी देविदास धनसिंग पाटील यांनी जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी.जे. मार्केट, जळगाव येथे तक्रारदाराकडून दीड लाख मागांची उनका स्वीकारताच त्यास पकडण्य यासदेखील अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!