भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

शिर्डीत साई भक्तांची मोठी फसवणूक!पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम

शिर्डी. मंडे टु मंडे न्युज | शिर्डीत पूजेच्या साहित्यामध्ये खऱ्या बदामांसोबत प्लास्टिकचे बनावट बदाम मिसळून विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिर्डीतील मंदिर परिसर व बाजारपेठेत पूजासाहित्याच्या पाकिटांमध्ये प्लास्टिकचे बदाम टाकून भाविकांची फसवणूक केली जात होती. नगरपरिषद कर्मचाऱ्याने पूजासाहित्य खरेदी करताना प्रसादाच्या पाकिटात प्लास्टिकचे बदाम पाहिले. तेव्हा हा साई भक्तांच्या भावनांशी खेळणारा धक्कादायक तसेच संतापजनक प्रकार समोर आला.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या पूजेसाठी बनावट साहित्य विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पूजा साहित्यात खऱ्या प्रसादासोबत प्लास्टिकचे बदाम मिसळून विक्री करणाऱ्या एका दुकानदाराला शिर्डी नगरपालिकेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषी दुकानदारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेलो असता, त्याला प्रसादाच्या पाकिटात खऱ्या बदामांसोबत प्लास्टिकचे बनावट बदाम असल्याचे आढळून आले. त्याने तात्काळ या प्रकाराबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित दुकानदाराला ताब्यात घेतले.
इतर दुकानांचीही तपासणी सुरू

या घटनेनंतर शिर्डी नगरपालिकेने सतर्कता बाळगत मंदिर परिसरातील आणि शहरातील इतर पूजा साहित्याच्या दुकानांचीही कसून तपासणी सुरू केली आहे. भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करून बनावट किंवा भेसळयुक्त वस्तू विकणाऱ्या कोणत्याही दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!