भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रमुंबई

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी ; थेट जनतेतून सरपंच निवडीची पद्धत बदलणार. आता सदस्यांमधून होणार सरपंचाची निवड

मुंबई.मंडे टु मंडे न्युज || सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62अ मध्ये सुधारणा आणि कलम 30 अ-1ब आणि कलम 145-1अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारीत वेळापत्रकात बदल करण्यास मंजूरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूनच व्हावी यासंबंधीचा ठराव राज्यातील जवळपास 9 हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीला मांडला होता

महाराष्ट्रातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच निवडीच्या पद्धतीबाबत राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा सरपंच थेट जनतेतून निवडला जातो. मात्र, ही पद्धत बदलून ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सरपंच निवडीच्या पद्धतीत बदल
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची निवड थेट मतदारांकडून केली जाते. प्रस्तावित बदलानुसार ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यानंतर त्यांच्यामधून सरपंचाची निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. या बदलामुळे ग्रामपंचायतींच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल होणार  आहे.

निवडणुकांची तयारी सुरू
राज्यात मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. मतदार याद्या, आरक्षण आणि अन्य निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू असून, दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!