मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महाराष्ट्रात जाहीर केला ‘अधिक मास सिल्व्हर ऑफर’!
आध्यात्मिक अन् सांस्कृतिक महत्त्वाची खास मोहीम
जळगाव,मंडे टु मंडे न्युज.डॉ.दीपक लोखंडे | जगातील आघाडीचे ज्वेलरी रिटेलर आणि विश्वास व जबाबदारीचे प्रतीक असलेले मलबार गोल्ड अँड डायमंड्स यांनी जळगावसह महाराष्ट्रातील निवडक शोरूम्स मध्ये ‘अधिक मास’ या शुभ कालखंडानिमित्त खास मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व साजरे केले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या परंपरांमध्ये खोलवर रुजलेला ‘अधिक मास’ हा आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा कालखंड मानला जातो. या काळात चांदीची खरेदी शुभ मानली जाते आणि ती भक्ती, समृद्धी व सकारात्मक सुरुवातीशी जोडलेली असते. या सांस्कृतिक भावनांचे प्रतिबिंब दाखवत मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भक्ती तसेच भेटवस्तूंसाठी खास तयार केलेले विविध सिल्व्हर कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये चांदीची देवप्रतिमा, पूजाविधीतील साहित्य, सिल्व्हर वेअर, पैंजण, पायातले रिंग्स, जोडवी तसेच आधुनिक आणि पारंपरिक अशा विविध सिल्व्हर डिझाइन्सचा समावेश आहे. हे सर्व उत्सव, आध्यात्मिक प्रसंग आणि दैनंदिन वापरासाठी खास तयार केले गेले आहे. सदर मोहिमेबाबत प्रतिक्रिया देताना मलबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी सांगितले की, “सण आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे प्रसंग भारतातील दागिने खरेदीच्या परंपरेत आजही महत्त्वाची भूमिका बजावतात.
महाराष्ट्रात ‘अधिक मास’ला विशेष सांस्कृतिक महत्त्व आहे, विशेषत: चांदी खरेदीच्या परंपरेत. या खास मोहिमेद्वारे आम्ही ग्राहकांना विचारपूर्वक निवडलेले सिल्व्हर कलेक्शन देत आहोत, ज्याद्वारे मलबार गोल्ड अँड डायमंड्सचा विश्वास, पारदर्शकता आणि दर्जा कायम आहे.” असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेच्या कालावधीत सहभागी शोरूम्सना भेट देणाऱ्या ग्राहकांना मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्या स्थापित ग्राहक आश्वासन पद्धतींचा लाभ मिळत राहील. यात पारदर्शक किंमत, प्रमाणित उत्पादने, सविस्तर बिलिंग आणि सेवा आधारित ग्राहक अनुभव यांचा समावेश आहे. अधिक मास सिल्व्हर ऑफर ही मोहीम दिलेल्या कालावधीत महाराष्ट्रातील निवडक मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूम्समध्येच लागू असेल.
या उपक्रमात सिल्व्हर वस्तूंवर मेकिंग चार्जेसमध्ये सरळ ३० टक्के सूट
» सदर खास मोहीम १७ मे ते १५ जून या कालावधीत महाराष्ट्रातील २३ निवडक मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूम्समध्ये उपलब्ध असेल. ‘अधिक मास ऑफर’ अंतर्गत ग्राहकांना सर्व सिल्व्हर वस्तूंवर मेकिंग चार्जेसमध्ये सरळ ३० टक्के सूट मिळणार असल्याचे मलबार गोल्ड अँड डायमंड्सच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील निवडक मलबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूम्समध्येच लागू असेल.
