भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभडगाव

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सीमा पदमिसंग परदेशी (वय २५, रा. महिंदळे) हिने ओळखीचा फायदा घेऊन पीडित अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करत सीमाने तिची ओळख तेजस मधुकर मराठे (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) याच्याशी करून दिली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवत सीमा परदेशी हिच्या घरातच तेजसने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले. सततच्या शोषणातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करत आहेत.तेजस मधुकर मराठे (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा), व सीमा पदमिसंग परदेशी (वय २५, रा. महिंदळे) या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!