भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर : अनधिकृत खत विक्रीचा पर्दाफाश! जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक कारवाई, कृषी क्षेत्रात खळबळ

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | जिल्ह्यात बनावट आणि अनधिकृत खतांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाने मुक्ताईनगर येथील ‘भूमिविकास ॲग्रो एजन्सी‘ वर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद खसांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
जिल्हास्तरीय भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, मुक्ताईनगर येथील भूमिविकास ॲग्रो एजन्सीमध्ये अनधिकृत खतांचा साठा करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे कृषी विकास अधिकारी श्री. मस्के साहेब आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. बोरसे साहेब तसेच मुक्ताईनगर कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण यांच्या पथकाने भूमिविकास ॲग्रो एजन्सीमध्ये एजन्सीच्या गोदामाची तपासणी केली.
तपासणी दरम्यान पथकाला खालील गंभीर बाबी आढळल्या:
विनापरवाना साठा: गोदामात असलेल्या खतांच्या साठ्याची नोंद एजन्सीच्या अधिकृत परवान्यात नव्हती.
संशयास्पद उत्पादने: ‘वरिता ॲग्रो, जळगाव’ या कंपनीचे 00:52:34 W-S आणि 00:00:50 W-S ही खते मोठ्या प्रमाणात विस्कळीत अवस्थेत आढळली.
नियमबाह्य पॅकेजिंग: खतांच्या गोणींवर आवश्यक असलेला बॅच नंबर आणि परवाना क्रमांक नमूद नव्हता.

पुढील कारवाई
खतांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्याने, भरारी पथकाने तातडीने या खतांचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनी आणि एजन्सीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

​सध्या पथकाकडून संबंधित कंपनीकडे खत विक्रीचा अधिकृत परवाना आहे की नाही, याची कसून चौकशी सुरू आहे. तोपर्यंत एजन्सीच्या गोदामाला सील ठोकण्यात आले असून विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
​”शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभाग सातत्याने कार्यरत आहे. कोणत्याही अनधिकृत विक्रीवर कडक कारवाई केली जाईल.”
— असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
​अशा प्रकारच्या कारवाईमुळे बोगस खते विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना अधिकृत परवाना आणि बॅच नंबर तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!