भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

आईला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक १७ वर्षीय मुलगी धरणगाव तालुक्यातील आपल्या आजीच्या गावाला गेली होती. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास, तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) हा तरुण तिच्या आजीच्या घरात अनधिकृतपणे शिरला. आरोपीने घरात शिरल्यानंतर पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्या तोंडाला स्कार्फ बांधला आणि तिला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या दहशतीखाली आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

घटनेची बाहेर कोणाकडेही वाच्यता करू नये म्हणून संशयित आरोपीने धमकावले होते.एवढ्यावरच न थांबता, ही घटना कोणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या आईलाही ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने धीर एकवटून १४ एप्रिल रोजी जळगाव गाठले आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तेजस गजानन हिरे (रा. पारगाव, ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने संशयित आरोपी तेजस हिरे याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!