कत्तलीच्या उद्देशाने नेली जाणारी ७ गोवंश व 3 वाहने जप्त; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ३ आरोपीना अटक, निंभोरा पोलिसांची कारवाई
बलवाड़ी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | निंभोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक १७/०६/२०२६ रोजी पहाटे ५:०० वाजताच्या सुमारास निंभोरा सिम गावाजवळ लावलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन ‘टाटा छोटा हत्ती’ गाड्यांना पथकाने शिताफीने पकडले. वाहनांची तपासणी केली असता, त्यात कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने डांबून नेले जाणारे एकूण ७ गोवंश (बैल व गो-हे) आढळून आले. चालकांकडे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ३ आरोपींना अटक केली आहे.
जप्त गोवंश पुढील संगोपनासाठी शृंगऋषी सेवाश्रम संचलित गोशाळेत दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी व मुद्देमाल:अनिस शेख अलीमुद्दीन (वय २८, रा. रसलपुर रावेर) – वाहन क्र. MH-45-6207 व ३ गोवंश. अरबाज बेग सईद बेग (वय २४, रा. मदिना कॉलनी रावेर) – वाहन क्र. MH-04 FU-4714 व २ गोवंश. शेख युनूस शेख अयुब (वय ४५, रा. रसलपुर रावेर) – वाहन क्र. MH-01 LA-4836 व २ गोवंश. आरोपींविरुद्ध निंभोरा पोलिसांत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) अभय ढाकणे करीत आहेत. सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोस्टेच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा कल्पेश देशमुख, मपोउनि ममता तडवी, पोकॉ प्रशांत चौधरी आणि पोकॉ महेंद्र महाजन यांच्या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


