भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रुग्णांच्या जीवाशी खेळणारी सावदयातील “ती” पॅथॉलॉजी लॅब कोणती? चर्चांना ऊत ! आरोग्यसेवा की पैशांचा गोरखधंदा?

सावदा ता. रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरातील एका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीतून रुग्णांना चुकीचे वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट) दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. “मंडे टू मंडे न्युज”ने हा प्रकार प्रकाशझोतात आणताच नागरिक, रुग्ण आणि वैद्यकीय क्षेत्रात चर्चांना अक्षरशः ऊत आला आहे.

रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या चाचण्यांमध्ये गंभीर चुका होत असताना संबंधितांकडून त्याला केवळ “प्रिंट मिस्टेक” म्हणून झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता सर्वत्र एकच प्रश्न विचारला जात आहे — सावदयातील ती पॅथॉलॉजी लॅब नेमकी कोणती?

यापूर्वीही घडला होता असाच प्रकार!

विशेष म्हणजे, ही पहिलीच घटना नसल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही काही रुग्णांना चुकीचे चाचणी अहवाल देण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती. त्यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यावेळीही सावदा शहरात संतापाची लाट उसळली होती. मात्र त्यानंतर नेमकी कोणती कारवाई झाली? दोषींना पाठीशी घालण्यात आले का? असे प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहेत.

किती रुग्णांच्या आरोग्याशी झाला असेल खेळ?

एका रुग्णाचा चुकीचा रिपोर्ट समोर आला, पण आतापर्यंत अशा किती रुग्णांना चुकीचे अहवाल देण्यात आले असतील? किती जणांवर चुकीच्या निदानामुळे अनावश्यक उपचार झाले असतील? किती जणांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ झाला असेल? या प्रश्नांनी नागरिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झाला आहे.

“सेवा” की पैशांचा गोरखधंदा?

आरोग्यसेवा हे संवेदनशील क्षेत्र मानले जाते. मात्र काही जणांनी याच सेवेचे व्यावसायीकरण करून ती पैशांचा गोरखधंदा बनविल्याचा आरोप होत आहे. रुग्णांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आर्थिक कमाईसाठी निष्काळजीपणा केला जात असेल, तर तो केवळ हलगर्जीपणा नसून गंभीर गुन्हाच मानला जावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

चौकशी करून कठोर कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पॅथॉलॉजीस्ट आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच दोष सिद्ध झाल्यास संबंधितांचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्ट्रेशन) रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी रुग्ण आणि नागरिकांकडून केली जात आहे.

तूर्त एवढेच…

सावदा शहरातील आरोग्य क्षेत्राला हादरा देणाऱ्या या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पॅथॉलॉजी लॅबचा भांडाफोड लवकरच?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!