खळबळ : त्रस्त मुलगा व पत्नी कडून व्यसनी पतीची हत्या
चाळीसगाव. मंडे टु मंडे न्युज | दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने आणि तिच्या अल्पवयीन मुलाने पित्याला ठार केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात मंगळवारी दुपारी घडली. सायकलच्या चाकात हवा भरण्याच्या पंपाने डोक्यावर वार करून आणि दोरीने गळा आवळून ही हत्या केल्याने याप्रकरणी पत्नीला अटक करून अल्पवयीन मुलास चाळीसगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या व्यसनापाई गहाण ठेवलेली दुचाकी सोडविण्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यामुळे मुलाने सायकलच्या चाकात हवा भरण्याच्या पंपाने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, तर पत्नीने दोरीने गळा आवळला. या इसमाला दारूचे व्यसन असल्याने त्यातच त्याने परस्पर जमीन विकल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. यामुळेच आई व अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.


