भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

श्रीराम जन्मोत्सव : सावदा येथे श्रीराम पालखी सोहळा व भजन कीर्तनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन

सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | सावदा शहरात दरवर्षीप्रमाणे रामनवमीच्या पावन निमित्ताने यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण सावदा शहर व परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

सावदा येथील श्री सुंदर श्री राम मंदिर, सावदा येथे श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनाक २६ मार्च २०२६ गुरुवार रोजी सकाळ पासून अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होणार असून त्यात
श्रीराम जन्मोत्सव पूजन, आरती व कीर्तन / भजन, करण्यात येणार असून श्रीराम जन्मोत्सवाच्या कीर्तनाची वेळ सकाळी ९:३० ते १२:३० अशी असणार असून  संध्याकाळी ५.३० वाजता राम नवमी या पावन दिनानिमित्त, श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमामुळे परिसरातील भाविकांना एकत्र येऊन श्रीरामाच्या नामस्मरणाचा लाभ घेता येणार आहे.

रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विशेष सजावट करण्यात येणार असून भक्तांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय राहण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात पुरुष, महिलांचा मोठा सहभाग राहणार असल्याचे कार्यक्रमाला अधिक रंगत येणार असून धार्मिक वातावरण अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता आणि भक्तीभाव वाढीस लागणार असून नागरिकांना आध्यात्मिक समाधान मिळणार आहे. श्रीराम मंदिर मंडळातर्फे सर्व समाज बांधवांनी श्री सुंदर श्री राम मंदिर. सावदा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!