भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावखेडा सिम येथे वार्षिक स्नेहसंमेलन “कलाविष्कार” उत्साहात संपन्न

यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 23 मार्च रोजी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड मॅडम व सहाय्यक गटविकास अधिकारी  महादेव शिंदे हे लाभले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ बेबाबाई पाटील या होत्या.

विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी सादर करून उपस्थितांची मन जिंकली. मुख्याध्यापकांनी व समस्त गुरुजन वर्गांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर प्रमुख पाहुण्यांनी स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर येतात आणि त्यांची स्टेज डेरिंग वाढते असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सावखेडा सिम, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री नामदेव सूर्यवंशी ,सौ आशा तडवी, सौ पुष्पा तायडे, श्री धीरज तायडे, श्री निखिल संभे, श्री शिवाजी रोहनकार, श्री आशिष भैसार, श्री अमोल राऊत या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!