खरेदी केलेल्या क्षेत्रावर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच, तलाठी एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | खरेदी केलेल्या शेती क्षेत्रावर नाव लावण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाच स्वीकारताना जळगाव लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे सजा करंज ता.जि. जळगाव यांच्या कार्यक्षेत्र हददीत शेती खरेदी केले असुन खरेदी केलेल्या क्षेत्रावर खरेदी नोंद लावण्याच्या मोबदल्यात तलाठी श्री अजय बिडवे सजा करंज ता. जि. जळगांव यांनी ५,०००/- रूपये लाचेची मागणी केली. म्हणुन तकारदार यांनी दि.२७.०२.२०२६ रोजी तलाठी अजय बिडवे यांचे विरूध्द ला.प्र.वि. जळगांव यांचेकडे लाच मागणी केल्याची तकार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २७.०२. २०२६ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तलाठी अजय बिडवे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या क्षेत्रावर खरेदी नोंद लावण्याच्या मोबदल्यात ५,०००/- रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार हे बिडवे तलाठी यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी गेले असता आलोसे यांना संशय आल्याने त्यांनी सदरची लाचेची रक्कम स्वीकारली नाही. करिता अजय बिडवे, तलाठी, सजा करंज ता.जि. जळगाव यांचेवर लाचमागणी प्रकरणी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. जळगांव. सापळा अधिकारी- स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव सापळा पथक पो.नि. हेमंत नागरे, श्रेणी पोउपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकों/संगिता पवार, पोना/बाळु मराठे, पोकों/अमोल सुर्यवंशी व पोकों / प्रणेश ठाकुर नेम.ला.प्र.वि.जळगांव.

