भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेरसावदा

सावदा परिसरात आयकर विभागाच्या कथित छापेमारीची चर्चा ; चार ठिकाणी एकाच वेळी कारवाई, कोट्यवधींच्या रकमेबाबत तर्कवितर्क!

सावदा. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज ||| रावेर तालुक्यातील लहान वाघोदा (वाघोदा बुद्रुक) येथील एका बड्या व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आणि निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती मिळत असून विशेष म्हणजे, लहान वाघोदा यासह निंभोरा, फैजपूर (सावदा फैजपूर रस्त्यावर) आणि सावदा या चार ठिकाणी एकाच वेळी आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती चर्चेद्वारे परिसरातून समोर येत आहे. ही कारवाई सलग दोन दिवस सुरू होती, असेही सांगितले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाबाबत आयकर विभागाकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. सदरील प्रकरण आर्थिक व्यवहारातून दडपण्यात आल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.

चार ठिकाणी एकाचवेळी छापेमारी झाल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, लहान वाघोदा येथील संबंधित व्यावसायिकाच्या व्यावसायिक आस्थापनासह निवासस्थानी तपासणी झाल्याची चर्चा आहे. याशिवाय निंभोरा, फैजपूर आणि सावदा येथेही एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. संबंधित ठिकाणी नेमकी कोणत्या स्वरूपाची तपासणी करण्यात आली, कोणत्या व्यावसायिकांच्या आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली आणि या कारवाईचा एकमेकांशी काय संबंध आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

कोट्यवधींची रक्कम आढळल्याची चर्चा
या कथित छापेमारी दरम्यान कोट्यवधी रुपयांची रक्कम आढळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, तपासणीदरम्यान प्रत्यक्षात किती रक्कम किंवा इतर मालमत्ता आढळली, याची कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
दरम्यान, एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही प्रकरण दडपण्यात आल्याची कुजबुज काही ठिकाणी सुरू आहे.

रोखीच्या व्यवहारांबाबत
संबंधित बड्या व्यावसायिकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी ग्राहकांकडून पैसे स्वीकारताना धनादेश किंवा फोन-पे यांसारख्या डिजिटल माध्यमांऐवजी शासकीय कर बुडविण्याच्या उद्देशाने प्रामुख्याने संपूर्ण रोख स्वरूपात रकमा स्वीकारल्या जात असतात.

अधिकृत खुलाशाकडे परिसराचे लक्ष
लहान वाघोदा, निंभोरा, फैजपूर (सावदा फैजपूर रस्त्यावर) आणि सावदा येथे कथितरीत्या झालेल्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गासह परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. आयकर विभागाने प्रत्यक्षात कोणती कारवाई केली, ती कोणत्या कारणासाठी करण्यात आली, तपासणीत काय आढळले आणि या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आयकर विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!