भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पुढचे २-३ दिवस महत्वाचे! “या” जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट, सतर्कतेचे आवाहन

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही भागात पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून येत्या दोन दिवसांत म्हणजे बुधवार व गुरुवारी अति वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सह

महाराष्ट्रात २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे

नाशिक विभागात तापी आणि हतनूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात बिकट परिस्थिती असून जिल्ह्यातील रावेरसह काही भागात पाणी शिरले आहे. २- ३ दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांचे आणि गुरांचे नुकसान झालेले आहे. पुण्यात पाऊस पडत आहे मात्र कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

आज १९ ऑगस्ट रोजी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

रेड अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा

ऑरेंज अलर्ट-

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली

येलो अलर्ट –

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

२० ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –
ऑरेंज अलर्ट- पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, येलो अलर्ट – रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याच पावासाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!