भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ, ५६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, तापी नदीला पूर

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने आज दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून १५९८.००  क्युसेक्स   (५६४३३.३७ क्युसेक्स) इतका प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आला.

हतनूर धरणाची ४ गेट पूर्णपणे व १६ गेट प्रत्येकी १ मीटर इतकी उघडण्यात आली आहेत. त्या मुळे तापी नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीकाठावर न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच गुरे-ढोरे नेणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!